रावेर । रावेर शहरामधून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तीन वर्षीय मुलीचा तिच्या सावत्र बापाने गळा आवळून खून केल्याची घटना घडली असून मुलीच्या आईने गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह मुक्ताईनगर तालुक्यात नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मुलीच्या खून प्रकरणी मुलीची सख्खी आई व सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली आहे. खूनामागील कारण समोर आलेले नाही. सदर घटना हि मुलीच्या सख्ख्या बापामुळे उघड झाली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माधुरी भारत मसाने व अजय शांताराम घेटे असे अटक केलेल्या आई वडिलांचे नाव आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी रहिवासी माधुरीचा वारोली येथील भारत मसाने याच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला होता. माधुरीला भारतपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलसवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी दुसरे लग्न केले होते. तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती. दि. ३१ मे रोजी अजयने तीन वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले तसेच गळा आवळल्याने ती मयत झाली.
हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी माधुरीने मुलगी आकांक्षाचा मृतदेह घेऊन तिचे माहेर बेलसवाडी (ता. मुक्ताईनगर) गाठले. पण, तेथील काही ग्रामस्थांना शंका येताच त्यांनी माधुरीच्या पहिल्या पतीला माहिती दिली. यानंतर भारत मसाने तातडीने बेलसवाडी येथे आला. नंतर घटनेचा भंडाफोड झाला
शवविच्छेदनातून झाली पोलखोल
बेलसवाडी येथून आकांक्षाचा मृतदेह अंतुर्ली पोलिस चौकी व तेथून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित करून शवविच्छेदन केले. त्यात गळा आवळून हत्या झाल्याचे उघड होताच माधुरी व तिचा दुसरा पती अजय घेटे यांना अटक करण्यात आली. दोघांनी आकांक्षा या चिमुरडीची हत्या का केली? हे अद्याप समजले नाही. तपास पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आशिष अळसूळ, हवालदार ईश्वर चव्हाण करत आहे.















Discussion about this post