जळगाव । काल बुधवारी रात्री भुसावळ शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून यावरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केला आहे. पोलीस आणि गुन्हेगार यांचे संगनमत असल्याने जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, काल रात्री भुसावळ शहरात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण पद्धतीने खून हा करण्यात आला आहे. आठ दिवसात जिल्ह्यात कुठे ना कुठे अशा मर्डरच्या घटना घडत आहेत. मागील आठवड्यात जळगाव शहरात देखील अशीच घटना घडली होती.
एकंदर पोलिसांना आरोपी सापडत नसून पोलीस यंत्रणा आणि आरोपींचे संगनमत आहे.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा गंभीर घटना घडत आहे. मी पोलीस अधीक्षकांची भेट घेत टोळी युद्ध, गुंडागर्दी जिल्ह्यात वाढली आहे यावर नियंत्रण आणावे, असे सांगितल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी एक शब्द देखील काढला नाही. यावरून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा किती बिकट झाली आहे हे दिसून येते. यासंदर्भात पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक केली पाहिजे, अशी मागणी मी सरकारकडे करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हटले आहे.















Discussion about this post