जळगाव । देशात विरोधकांकडून EVM च्या विश्वासार्हतेवर अनेकवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून अशातच जळगावमध्ये ज्या ठिकाणी ईव्हीएम मशिन्स ठेवलेल्या आहेत त्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद पडले. यामुळे खळबळ उडाली.
जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोन वरून माहिती दिली. त्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला. वीज पुरवठा खंडीत झाल्याने सीसीटीव्हीचे डिस्प्ले बंद झाल्याचं सांगण्यात येत आहे. केवळ चार मिनिटांसाठी डिस्प्ले बंद होते. मात्र व्हिडीओ चित्रिकरण सुरुच होते, असं प्रशासनाने सांगितलं.
यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, चार मिनिटांसाठी डिस्प्ले बंद होते, परंतु व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरुच होतं. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना रेकॉर्डिंग दाखवले आहेत. त्यामुळे कुणाचीही तक्रार नाही, असं त्यांनी सांगितलं.















Discussion about this post