जळगाव ।सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात तापमान वाढीने कहर केला असून याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीविशेष आदेश पारित केले आहेत. आदेशात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात दि. २५ रोजीपासून ते दि. ३ जुन पावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ चे आदेश लागू करण्यात येत आहे. खालील प्रमाणे आदेशीत करण्यात येत आहे.
1) उक्त नमूद कालावधीत अंगमेहनत करणा-या कामगारांनी उन्हात काम करु नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करुन घेता येणार नाही.
2) ज्या कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी कामगारांना काम करण्यासाठी पुरेसे शेड तयार करणे, कुलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करुन घेण्याची जबाबदारी संबंधित मालकांची राहील, याबाबत काहीएक तक्रार असल्यास ती संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, पोलीस विभाग यांचेकडेस करता येईल.
3) खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चाललवावेत. तद्नंतर सकाळी १० ते ५ या वेळेत कोचिंग क्लासेस सुरु ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटर मध्ये पुरेसे पंखे, कुलर व तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची राहील.
Discussion about this post