मुंबई । गेल्या महिनाभरापासून सोन्यासह चांदीच्या किंमतींमध्ये चढउतार सुरुच आहे. अशात आजही सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. सोन्याच्या किंमती आज तब्बल ८०० रुपयांनी कमी झाल्यात. तर चांदीच्या किंमती ३०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत याबाबत जाणून घेऊ.
आज सोने प्रति तोळा २४ कॅरेट सोनं ७४,३०० रुपयांनी विकलं जात आहे. २२ कॅरेट सोनं ६८,४५० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५६,००० रुपये प्रति तोळा दराने विकलं जात आहे. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज चांदीच्या किंमती ३०० रुपयांनी महागल्या आहेत. यामुळे चांदीचा दर विनाजीएसटी ९३००० हजारापर्यंत विकली जात आहे. मे महिन्याच्या केवळ १८ दिवसांत तीन टक्के जीएसटीएसह शुद्ध चांदीचे प्रतिकिलो भाव ९ हजार ३७३ रुपयांनी वाढले
मुंबई
सोनं – ७,४५१ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
अहमदाबाद
सोनं – ७,४५६ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
पुणे
सोनं – ७,४५१ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो















Discussion about this post