नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक विभागाकडून भरती राबविली जात असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.
ही भरती प्रक्रिया तब्बल 30 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाचीही अट ही लागू करण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जून 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
ही पदे भरली जाणार?
डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
लेखी परीक्षा आणि मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. 26 वयोगटापर्यंतचे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आलीये.
https://www.barc.gov.in/careers/vacancy9.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. उमेदवारांनी अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. https://www.barc.gov.in/ या साईटवर जाऊन आपण या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.















Discussion about this post