छत्रपती संभाजीनगर : राज्यात होणाऱ्या अपघाताचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना वारंवार समोर येत असून अशातच या महामार्गावरील वैजापुरजवळ भीषण अपघात झाला. हज यात्रेसाठी मुंबई येथून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात निघालेल्या कारचा वैजापूरजवळ अचानक टायर फुटल्यामुळे कार अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात १ वर्षाच्या अख्तर रझा या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील आझाद अली खान (वय ४९ वर्षे), अफताब अली (वय २४ वर्षे), खुशबू आलम खान (वय २६ वर्षे) यास्मिन खान (वय १८ वर्षे), सोहेल आलम खान (वय ३० वर्षे) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
छाप्रा येथील हा परिवार सध्या नवी मुंबईमध्ये स्थायिक झाले आहे. गया येथून १७ जून रोजी ते विमानाने हज यात्रेसाठी जाणार होते, त्यासाठी ते आपल्या गावी छात्रा येथे जात होते. समृद्धी महामार्गावरुन जात असताना जांबरगाव व लासूरगाव दरम्यान शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कॉरिडॉरजवळच्या उलटली आणि गाडीचे टायर फुटल्याने ही दुर्घटना घडली.
या अपघातात गाडी चक्काचूर झाला आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर आतापर्यंत जवळपास १००० हून अधिक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जवळपास ५० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.















Discussion about this post