मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोपडलं आहे. यामुळे शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच राज्यात 20 मेपर्यंत अवकाळी पावसाचं संकट कायम असून आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच तापमानामध्ये वाढ होऊन उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, ढगाळ आकाशामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी उन्हाचा चटका कमी झाला आहे. तर कमाल तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याचं पाहायला मिळालं आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
सोलापूर, कोल्हापूर, जालना, सिंधुदुर्ग, नगर, सांगली, बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशीम या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाने केलं आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता
दरम्यान, जळगाव, नाशिकमध्येही अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Discussion about this post