नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रोड शो करणार आहेत. नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँडिंग झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या २ बॅगांची तपासणी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नटे संजय राऊत यांनी शिंदेंनी बॅगांमधून पैसे आणल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगांची तपासणी ही झाली आहे. ‘आम्ही पुन्हा बॅग घेऊन आलो आहोत’, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.















Discussion about this post