जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच जळगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत २३ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ८ मार्च २०२३ रोजी महिलेची ओळखी विकास प्रकाश अडकमोल रा. गेंदालाल मिल, जळगाव याच्याशी झाली. विकासने महिलेचा ओळखीचा फायदा घेत जवळीक साधली. त्यानंतर तिला लग्नाने आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. हा प्रकार सहनने झाल्याने अखेर पिडीत महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून विकास अडकमोल याच्या विरोधात फिर्याद दिली.
त्यानुसार बुधवारी १ मे रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी विकास प्रकाश अडकमोल वय २३ रा. गेंदालाल मिल, जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे हे करीत आहे.















Discussion about this post