जळगाव । जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची आज सोमवारी अंतिम मुदत होती. त्यानुसार आता दोन्ही मतदार संघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
माघारीच्या अंतिम दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे आता महायुतीच्या स्मिता वाघ, महाविकास आघाडीचे करण पवार या दोघा प्रमुख पक्षांच्या उमेदवारासह एकूण 14 उमेदवार जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जळगावमधून यांची माघारी
संजय एकनाथ माळी , रोहित दिलीप निकम लक्ष्मण गंगाराम पाटील, डॉ. प्रमोद हेमराज पाटील , संग्रामसिंह सुरेश सूर्यवंशी व प्रदीप शंकर आव्हाड या अपक्ष सहा उमेदवारांनी आज माघार घेतली आहे.
दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघात पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे आता महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील व बहुजन समाज पार्टी या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवारासह एकूण 24 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं स्पष्ट झाले आहे.
रावेरमधून यांची माघारी
रावेर लोकसभा मतदारसंघातून शेख रहुब युसुफ, राहुल रॉय अशोक मूळे, नितीन प्रल्हाद कांडेलकर, शेख कुर्बान शेख करीम.. नाजमीन शेख रमजान या सहा पक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.















Discussion about this post