यवतमाळ । एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. तर दुसरीकडे उन्हामुळे अनेक राजकीय नेत्यांना मोठी झळ बसताना दिसत आहे. दरम्याम, यवतमाळच्या पुसद येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. पण संबंधित घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज यवतमाळच्या पुसद येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या आयोजनानुसार नितीन गडकरी भाषणासाठी आले. ते भाषण देत असताना अचानक त्यांना भोवळ आली. यावेळी मोठी तारांबळ उडाली.
नितीन गडकरी यांच्या अंगरक्षकांनी त्यांना पकडलं. तर इतरांनी तातडीने त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. यानंतर नितीन गडकरी यांना खुर्चीवर बसवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर सभास्थळी ग्रीन रुममध्ये त्यांना बसवण्यात आलं आहे. त्यांची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.















Discussion about this post