जळगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला असून उद्या दिनांक २५ एप्रिल रोजी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यात येणार आहे.या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदारॲड.जयप्रकाश बाविस्कर व अभिजीत पानसरे (नेते मनसे) मुंबई हे उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ॲड.जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उद्या १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित रहावे असे आवाहन मनसे ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.















Discussion about this post