मुंबई । सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असताना शिवसेना ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. मराठवाड्यातील धराशिवचे भाजपाचे नेते आणि माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाजी कांबळे दोन वेळा खासदार राहिले आहेत. तसेच पक्षाच्या प्रदेश कमिटीत ते पदाधिकारी आहे.
शिवाजी कांबळे यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातून 1996 व 1999 साली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. दोन्ही वेळा ते शिवसेनेत होते. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. परंतु काँग्रेस उमेदवार अरविंद कांबळे यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यानंतर ते शिवसेना सोडून भाजपत गेले होते. आता पुन्हा ते स्वगृही जात आहेत.
माजी खासदार शिवाजी कांबळे हे सध्या भाजपाच्या प्रदेश कमिटीमध्ये पदाधिकारी होते. काँग्रेसच्या बालकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम १९९६ मध्ये त्यांनी केले होते. शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव करून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकाविला होता. आता पुन्हा ते भाजप सोडून शिवसेनेत जात आहे.















Discussion about this post