मुंबई : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधील महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा वादग्रस्त व्यक्तव्य केलं. यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
राज्यातील मेंढपाळांनी जर मेंढ्या आणि बकरी राखायचे बंद केले तर लोकांना कुत्री कापून खायची वेळ येईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या आधीही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहे.
खासकरून शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका करताना पडळकरांनी टोकाचे शब्द वापरल्याचं दिसतंय. आताही त्याच प्रकारचं वक्तव्य केल्याने त्यावरून राजकीय वाद होतो का हे पाहावं लागेल.















Discussion about this post