मुंबई : दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘ला निना’च्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला आहे. यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त आणि दीर्घ-काळाच्या सरासरीच्या (८७ सेंमी.) १०६ टक्के असेल, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी दिली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती कशी असेल, कोणत्या राज्यांमध्ये चांगला पाऊस आणि कुठे कमी पाऊस होईल, याबाबत माहिती दिली. देशात ८० टक्के भागांत सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने गेल्यावर्षी ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला होता.
कधी किती पाऊस?
१९७१ ते २०२० पर्यंतच्या पावसाच्या सरासरीनुसार १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी ८७ सेंमी पाऊस पडतो.
पावसाची वर्गवारी
९६ ते १०४%- सामान्य
१०५ ते ११०% – सामान्यपेक्षा जास्त
९० ते ९६% – सामान्यपेक्षा कमी















Discussion about this post