भुसावळ : उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, यासाठी रेल्वेने संबळपूर ते पुणे दरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. क्र. ०८३२७ ही गाडी १४ एप्रिल ते ३० जून या दरम्यान प्रत्येक रविवारी संबळपूर येथून २२:०० वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी २:४५ वाजता पोहोचेल.
तसेच क्र. ०८३२८ ही साप्ताहिक विशेष गाडी १६ एप्रिल ते २ जुलैपर्यंत प्रत्येक मंगळवारी पुणे येथून ९:१५ वाजता सुटेल आणि संबळपूर येथे दुसऱ्या दिवशी १३:३० वाजता पोहोचेल.
या गाडीला बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंद, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगांव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन इथे थांबे असतील.















Discussion about this post