मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना आज रविवारी पहाटे घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घराबाहेरील गोळीबारात सलमान खानच्या घरात गोळी घुसल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणाचा कसून तपास सुरु असून या संदर्भात आता नवीन अपडेट समोर आली आहे. सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक टीम, पोलीस, मुंबई गुन्हा शाखेकडून तपास सुरु आहे. पोलीस यंत्रणा अलर्टवर आहेत.
रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थाना बाहेर गोळीबार झाला. बाईक वरून आलेल्या दोन अज्ञातांनी केलं आणि पळ काढला. सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला. आता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या चार वॉचमनचे जबाब नोंदवले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे सलमान खानच्या घरात एक गोळी घुसली. भाईजानच्या घरात गोळी घुसल्याची माहिती समोर आली आहे. गॅलरीत असलेल्या पडद्यातून एक गोळी आरपार झाली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने गॅलरीमध्ये कुणी नव्हतं, गॅलरी रिकामी होती. एकूण पाच गोळ्या झाडण्यात आल्याचं आता तपासात समोर आलं आहे. एक गोळी पडद्यातून आरपार गेली आणि एक गोळी भिंतीवर लागली, तर तीन पुंगळ्या रस्त्यावर सापडल्या आहेत.
या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. गोळीबार करणाऱ्या आरोपीने आपलं संपूर्ण शरीर झाकलेलं होतं. दोन जण दुचाकीवरून आले, फायरिंग केली आणि निघून गेले.















Discussion about this post