धुळे । धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने माजी मंत्री शोभा बच्छाव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मोठा डाव टाकला आहे. या मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाणचा परिसर येत असल्याने काँग्रेसने ही रणनीती आखली आहे. धुळ्यातील काँग्रेस नेत्यांने निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र काँग्रेसची ही नवी रणनिती यशस्वी होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
गेल्या तीन निवडणुकांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्याबाहेरील उमेदवाराला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शोभा बच्छाव यांचा नाशिक जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये तगडा जनसंपर्क असल्यामुळे काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातून आता दोन डॉक्टरांची लढाई खासदारकीसाठी रंगणार आहे. माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ.शोभा बच्छाव विरुद्ध माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यात सरळ लढत होणारे आहे. डॉक्टर शोभा बच्छाव या गेल्या तीन दशकापासून काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. सुरुवातीला नाशिक महापालिकेच्या महापौर त्यानंतर त्यांनी दोन वेळेला आमदारकी भूषवली आहे. यामध्ये आरोग्य राज्य मंत्रिपद सुद्धा मिळालेलं असल्याने त्यांना चांगला प्रशासकीय अनुभव आहे. मात्र धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक शहरातील निवासी उमेदवाराची घोषणा ही डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post