जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा घरवापसी करणार असून स्वत: एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान, खडसे यांच्या भाजप वापसीवर राज्यासह जळगावमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच कट्टर विरोधक असलेले देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
खडसे यांच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तर त्याला विरोध नाही. मात्र पक्षाने अजून आम्हाला कळविले नाही. पक्षाने कळवले आम्ही त्यांचे स्वागतच करु.
गिरीश महाजन म्हणतात…
खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल त्यांचे जळगाव जिल्ह्यातील राजकीय विरोधक गिरीश महाजन म्हणाले, खडसेंचा प्रवेश कधी होणार आहे, हे त्यांनाच माहीत आहे. खडसेंचा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे. अमित शाह यांच्याशी आहे, असे ते म्हणतात. एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की, आमची भूमिका तिच राहणार आहे. ते दिल्लीला, जात आहेत, येत आहेत. आता त्यांनी सांगितलंय 15 दिवसांनी प्रवेश घेणार आहे. वाट बघू, एकनाथजी खूप मोठे नेते आहेत. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचे ते काम नाही. त्यांचा प्रवेश राज्यात होणार नाही. दिल्लीत त्यांचा प्रवेश होणार आहे. यामुळे त्यांच्याविषयी फार बोलणे संयुक्तीक नाही.















Discussion about this post