जळगाव । बिलवाडी येथील तरुणासोबत बनावट लग्न करून अडीच लाख रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणाच्या वडीलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. पण अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
प्रौढाच्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी चौगाव (ता. चोपडा) येथील कैलास पाटील या दलालाच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील तरुणीचे स्थळ सूचवले. पुढे बोलणे होऊन नांद्रा (ता.पाचोरा) येथे १२ नोव्हेंबर रोजी दोघांचे लग्न झाले. लग्नात रोख रक्कम व दागिने अशी अडीच लाख रुपये मुलाकडून वधू व तिच्या नातेवाइकांना दिले. अडीच महिने दोघांचा संसार सुरु होता. ७ जानेवारी रोजी भावाच्या मुलाचे सेंधवा येथे आवळाचा कार्यक्रम आहे, असे सांगितले.
त्यासाठी तक्रारदार व दोघे नवरा-बायको चोपडा येथे गेले. येथे रामसिंग पावरा आला. त्याने मी पुतणीला घेऊन पुढे जातो असे सांगून तिला सोबत गेले. तक्रारदार व त्यांचा मुलगा दोघे सेंधवा येथे पोहचले, तेव्हा नवरी मुलगी व तिचा काका यांनी गुंगारा देऊन पसार झाले. त्यानंतर मुलाने व त्याच्या वडीलांनी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद आला. याबाबत तक्रारदाराने दलाल कैलास पाटील (रा. चौगाव), नववधू निर्मला पावरा, कालु पावरा व एक साथीदार (सर्व रा. मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे














Discussion about this post