जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपने यंदा विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारून त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उन्मेष पाटील पक्षावर नाराज आहेत. या नाराजीचा फायदा घेत उद्धवसेनेने उन्मेष पाटील यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केलेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, उन्मेष यांच्या पत्नी संपदा यांना उद्धवसेनेकडून जळगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संपदा यांनी प्रचारही सुरू केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते तथा चाळीसगावचे दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांना उद्धवसेनेकडून उमेदवारी द्यावी, असाही प्रस्ताव असून त्याला शरद पवार यांनी संमती दिल्याचे वृत्त आहे. मात्र, प्रमोद पाटील तयार नसल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे संपदा यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर करायची, अशी ठाकरेंच्या शिवसेनेची राजकीय खेळी आहे















Discussion about this post