धरणगाव । ट्रक आणि दुचाकीचा झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना धरणगाव- चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ घडली. युवराज काशिनाथ महाजन (वय-५०) आणि मच्छिंद्र सिताराम पाटील (वय-५०) दोन्ही रा. विखरण ता. एरंडोल असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, युवराज काशिनाथ महाजन हे दुचाकी (एम.एच.19-4490) वरून सहकारी मच्छिंद्र पाटील यांच्यासोबत दोघे वर्डी ता. चोपडा येथे सुखनाथ महाराजांच्या भंडारा साठी गेले होते.चोपड्याकडुन येत असताना धरणगाव चोपडा रस्त्यावरील जी.एस. ट्रेडिंगजवळ अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महाजन यांचा जागीच मृत्यू झाला तर मच्छीद्र पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला.
याबाबत धरणगाव पोस्टे खबर विठ्ठल तुळशीराम महाजन यांनी दिल्यावरून अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पीएसआय करीम सैय्यद हे करीत आहे. अपघात घडल्यानंतर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गोपाल पाटील, अमोल चौधरी, गौतम सोनवणे, विनोद रोकडे, गजानन महाजन आदींनी धाव घेत जखमीला उपचारार्थ धरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले होते त्यात जखमीचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post