मुंबई । एकीकडे लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसं ईडीच्या कारवायाचं सत्र देखील वाढलं आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
राज्यात कोरोनाचं संकट असताना लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे पॅकेट पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. यात १६० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता.
या प्रकरणात माजी मंत्री अनिल परब, माजी मंत्री रविंद्र वायकर यांची देखील चौकशी झाली होती. तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देखील चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर सूरज चव्हाण यांना अटकही करण्यात आली होती. आता या प्रकरणात अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आलं आहे.















Discussion about this post