मुंबई । ठाकरे गटाच्या गोटातून मोठी बातमी हाती आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अनेकांचं लक्ष लागलं होतं. काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून तिढा होता. यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. त्यानंतर आज बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली.
खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. ‘ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे, अशी पोस्ट करत राऊतांनी याविषयी माहिती दिली. ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीमधील जागावाटपांचा तिढा मिटला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
लोकसभा उमेदवारांची यादी खालील प्रमाणे…
बुलडाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
मावळ- संजोग वाघेरे पाटील
सांगली- चंद्रहार पाटील
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशीव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक – राजाभाऊ वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी- संजय जाधव
दक्षिण मध्य – अनिल देसाई















Discussion about this post