नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी असून विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) यांच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड स्कूल येथे काही पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे.
या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. विशेष म्हणजे दहापी पास आणि आयटीआय पास असलेल्यांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी indiannavy.nic.in या साईटवर जा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे.
या पदांवर होणार भरती :
या भरती प्रक्रियेतून इलेक्ट्रिशियन, फिटर, डिझेल मेकॅनिक, प्लंबर अशी विविध पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेतून 301 जागा या भरल्या जाणार आहेत.
या भरती प्रकियेसाठी आठवी पास आणि दहावी पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. आयटीआय उत्तीर्ण उमेदवार हा असायला हवा. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 5 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.















Discussion about this post