मुंबई । महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असताना आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नांना तडा गेला आहे. परिणामी, लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदारांचा खुश ठेवण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.
देशात खाद्यतेलाचे दर कमी होण्याऐवजी १५ दिवसांपासून भडकले आहेत. सर्व खाद्यतेलात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याने स्वयंपाकघरातील फोडणी महागली आहे. होळी आणि रमजान महिन्यामुळे पाम तेलाचे दर मलेशिया देशातच महाग झाले आहेत. रमजान ईद साजरी होईपर्यंत दर कमी होण्याची शक्यता नाहीच. ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post