पिंपरी (जि. पुणे) : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी गेल्यानंतर पतीने नैराश्यातून भयानक पाऊल उचलले. आठ वर्षीय मुलीचा गळा दाबून बापाने गळफास घेतल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील थेरगाव भागात उघडकीस आली. भाऊसाहेब भानुदास बेदरे (४३, मूळ रा. बेदरेवाडी, जि. बीड) आणि नंदिनी भाऊसाहेब बेदरे (८) अशी मृतांची नावे आहेत. बेदरे कुटुंब १५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहे.
पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथे भाऊसाहेब बेदरे (वय ४३) त्यांची पत्नी राजश्री राहतात. त्यांना आठ वर्षांची नंदिनी आणि पंधरा वर्षांचा आशीष हा मुलगा आहे. या चौकणी कुटुंबात काय घडले? त्यामुळे दोन जणांचा जीव गेला, हा प्रश्न आहे. भाऊसाहेब बेदरे यांची पत्नी राजश्री माहेरी गेली होती, त्याचवेळी हा प्रकार घडला.
भाऊसाहेब यांच्या पत्नी राजश्री कामानिमित्त गावी गेल्या होत्या. त्यानंतर पहाटे त्या घरी परतल्या. त्यावेळी घरी नेण्यासाठी त्यांनी भाऊसाहेब यांना फोन केला. परंतु भाऊसाहेब यांना फोन उचलला नाही. त्यामुळे त्या स्वत: घरी पोहोचल्या. घरी आल्यावर आशिषने दरवाजा उघडला. त्यांनी बाबा कुठे आहेत? अशी विचारणा आशिषकडे केली. त्यानंतर बेडरुममध्ये गेल्यावर मुलगी झोपलेली दिसली. ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्यांना हादरा बसला. त्यानंतर किचनमध्ये आल्यावर भाऊसाहेब बेदरे यांनी गळफास घेतलेले दिसले. दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
पोलिसांना मिळाली सुसाईड नोट
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईट नोट मिळाली. त्यामध्ये कारण दिले आहे. आर्थिक विवंचनेतून जीवन संपवत असल्याचे भाऊसाहेब यांनी त्या नोटमध्ये म्हटले आहे. भाऊसाहेब बेदरे हे बांधकाम व्यवसायात आहेत. ते ठेके घेत असल्याची माहिती समोर आली आहे.















Discussion about this post