जळगाव/अकोला । कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून कापूस दरात वाढ होताना दिसून आली. राज्यातील जळगावसह बहुतांश बाजार समित्यांमध्ये कापसाला ७५०० ते ८००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.
राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, गुलाबी बोंडअळीचा कापूस पिकाला मोठा फटका बसला होता. तर अनेक ठिकाणी पिकासाठी योग्य वातावरण राहिलं नाही, त्यामुळं उत्पादनावर परिणाम झालाय. त्यातच कापसाला सुरुवातीला ८००० हजारापर्यंतचा भाव मिळाला होता.
मात्र त्यांनतर दरात घट दिसून आली. दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला होता. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दरात वाढ न व्हता घट दिसून आली होती. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. गेल्या महिन्यात ६२०० ते ६५०० हजारावर असलेला कापसाचा दर आता ७५०० ते ८००० हजार रुपयांवर आला आहे. या दरामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाल आहे.















Discussion about this post