रावेर । आधीच केळी पीक विमा न मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी नाराज असून अशातच मात्र बोर्डभावापेक्षा ७०० ते ८०० रुपये कमी दराने केळी विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे. नाराज असलेल्या शेतकऱ्यांच्या संतापात भर पडली आहे.
रावेर आणि यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन घेतलं जाते. मात्र न्हावीसह परिसरात बोर्डावर केळीला १९५० रुपयांचे भाव दिसत असले तरी प्रत्यक्ष व्यापारी ११०० ते एक हजार रुपये क्विंटलने केळी मागणी करताय. म्हणजे बोर्डावरील भाव आणि प्रत्यक्ष खरेदीत ७०० ते ८०० रुपयांची तफावत दिसते. दुसरीकडे अजूनही हवामानावर आधारीत केळी पीक विमा मिळालेला नाही. त्यासाठी सर्वांनी वाऱ्यांवर सोडल्याची शेतकऱ्यांमध्ये भावना आहे.
आजही किरकोळ केळी विक्रीचा दर ३० ते ६० रुपये डझन आहे. तरीसुद्धा व्यापारी निम्म्या भावाने केळी खरेदी करून लूट करतात.जबाबदार लोकप्रतिनिधी दखल घेऊन उपाय करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. न्हावी परिसरात शेतकरी केळी लागवडीपासून ते कापणीपर्यंत प्रचंड मेहनत घेतात. यादरम्यान वादळवारा, जास्त तापमानाने मेहनतीवर पाणी फिरते.















Discussion about this post