मुंबई । राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज (साेमवार) खासदार उदयनराजे भाेसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी खासदार उदयनराजे भाेसले यांची भेट घेतली. या दाेन्ही नेत्यांमध्ये आगामी काळातील लाेकसभा निवडणुकीविषयी चर्चा झाली.
सातारा लाेकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भाेसले यांची उमेदवारी डावलण्याची चर्चा सुरु आहे. याच चर्चेदरम्यान गिरीश महाजन यांनी भेट घेतली. जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांंशी बाेलताना गिरीश महाजन म्हणाले की उदयनराजे भाेसले यांना डावलण्याचा प्रश्नच येत नसून आम्हांला लाेकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात निवडणुकीसाठी कसा उपयोग होईल याबाबत चर्चा करण्यासाठी आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. उदयनराजे भाेसले यांची उमेदवारी ही पक्षाची गरज असल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
त्यांची उमेदवारी निश्चित आहे. भाजपला त्यांच्या उमेदवारीची गरज आहे. महायुतीत तीन पक्ष असल्याने चर्चा सुरू असल्याने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागत आहे असेही महाजन यांनी स्पष्ट केले. महायुतीत तीन पक्ष असल्याने चर्चा सुरू असल्याने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागत आहे असेही महाजन यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post