नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा थोड्यावेळात जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार माध्यमांशी संवाद साधत आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांच्यसह निवडणूक आयुक्त एस.एस. सिंह आणि ज्ञानेश कुमारही येथे हजर आहेत.
दरम्यान, निवडणुकीदम्यानच्या योजनांची माहिती यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार देत आहे. ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी असून देशातील निवडणूक म्हणजे एक सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. 16 जूनला 17 व्या या लोकसभेची मुदत संपत असल्याची माहिती यावेळी राजीव कुमार यांनी दिली. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होतील असंही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले
देशात एकूण ९७ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत.देशात साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, 55 लाखांपेक्षा अधिक EVM, 1.2 कोटी प्रथम मतदार, 48 हजार तृतीयपंथी, 100 वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या 2 लाख , 1.5 कोटी निवडणूक अधिकारी, १८ ते २१ वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी, १२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
या निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा करण्यात येणार. 85 वर्षांवरील व्यक्तींसाठी घरी जाऊन मतदान करून घेणार. पोलिंग बूथवर येऊ न शकणाऱ्यांसाठीही घरोघरी मतदानाची सोय करण्यात येईल. निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. मतदाराला तक्रार असल्यास सी-व्हिजील ॲपवर नोंदवता येईल.मसल पॉवर, मनी पॉवर रोखण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं.
पैसे वाटताना सापडल्यास काय करायचं?
दरम्यान, निवडणुकीदरम्यान कुठे पैसा वाटप सुरू असेल , कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲप वर टाकून कारवाई केली जाईल. तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोचतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
निवडणूक प्रचारादरम्यान, स्टार प्रचारकांना नियमावली देण्याची आदेश पक्षांना देण्यात आले आहेत. भाषेचा स्तर घसरल्याची त्याची दखल घेण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.















Discussion about this post