जळगाव । भाजपने रावेर लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. रावेरमधून रक्षा खडसे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असतानाच आता महाविकास आघाडीकडून त्यांच्या भावजय रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत सूचक विधान केले आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
“रोहिणी खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार असू शकतात, असे महत्वाचे विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. रोहिणी खडसे यांच्या नावाला स्थानिक नेत्यांचा पाठिंबा आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची तशी मागणी आहे, असे म्हणत येत्या दोन तीन दिवसात याबाबत निर्णय होईल,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांच्या प्रवेशाबाबतही महत्वाचे विधान केले आहे. “निलेश लंके शरद पवार यांना भेटण्यासाठी आज येत आहेत. निलेश लंके लोकांमधले नेते आहेत ते पक्षात आले तर स्वागतच आहे, असे म्हणत आमचे जागा वाटप अजून झाले नाही, पण निलेश लंके एक चांगला चेहरा आहे,” असे सूचक वक्तव्यही जयंत पाटील यांनी केले आहे.















Discussion about this post