नवी दिल्ली । दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी गुरुवारी बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. या बैठकीनंतर लगेचच काँग्रेस आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी दोन्ही निवडणूक आयुक्तांची नावे जाहीर केली. ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यामुळे आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना नवनियुक्त आयुक्त मदत करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन दास यांच्या समितीने या दोन्ही नावांना संमती दिल्याची माहिती आहे. अरूण गोयल यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर एकून रिक्त पदांची संख्या दोन झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलून या निवडी केल्या आहेत.
यासंबंधीची माहिती देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्जुन राम मेघवाल आणि माझ्या समितीने या नियुक्त्या केल्या आहेत. मीटिंगमध्ये मी एक छोटी यादी मागितली होती. त्यावेळी छोटी यादी सादर करावी असे सांगण्यात आले. कारण निवडीपूर्वी छोट्या याद्या बनवल्या जातात. त्यामुळेच मी ती यादी मागितली होती. ती यादी मला लवकर मिळाली असती तर दिल्लीत पोहोचल्यावर मला उमेदवारांची माहिती मिळाली असती. पण ती संधी मला मिळू शकली नाही.















Discussion about this post