पुणे । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का बसला असून पुण्यातील वरिष्ठ नेते वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मोरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहित मनसेला जय महाराष्ट्र करत असल्याचं जाहीर केलं आहे. अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा…, असं ते म्हणालेत.
माझ्या नाराजीचा कडेलोट झाला त्यामुळे मी आता पक्ष सोडला आहे. माझ्याविरोधात सातत्याने काही गोष्टी पसरवल्या जात होत्या. तसंच त्या गोष्टींची शहानिशा न करता मला निष्ठा सिद्ध करावी लागत होती. मी फक्त अग्निपरीक्षाच देणं बाकी होतं असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/vasantmore88/status/1767456858842058946
“पक्षामध्ये अंतर्गत अनेक गोष्टी आहेत. पुणे शहरांतून लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक होतो. माझ्याबाबत वारंवार नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहचवल्या गेल्या. त्यामधून कुठलीही शहानिशा न करता माझ्यावर आरोप केले गेले. वसंत मोरे स्वकेंद्रीत राजकारण करतो असेही आरोप केले गेले. वास्तविक मी हे कधीही केलं नाही. जे काही केलं ते पक्षहितासाठीच केलं. माझ्यावर, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. त्यामुळे आता माझ्यापुढे काही पर्याय राहिला नव्हता. मी कुठल्या पक्षात जाणार काय निर्णय घेणार हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट करेन. मी मनसे सोडली आहे, सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.















Discussion about this post