जळगाव । आगामी लोकसभा लोकसभा निवडणुकीपूर्वीच जळगावात भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पदाधिकारी ललिता पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटाचे ‘शिवबंधन’ हाती बांधले. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडे होता. मात्र, आता तो शिवसेना ठाकरे पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याच वेळी त्यांचा प्रवेश होणार हे निश्चित झाले होते.
अखेर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत , जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, विराज कावडीया, महानगर प्रमुख शरद तायडे, वैशाली सूर्यवंशी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ आदी उपस्थितीत होते.
या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ललिता पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले. जळगाव लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. प्रथमच पक्षातर्फे ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी पक्षातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, जळगाव लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजयी करायचाच आहे. त्यासाठी सर्वांनी ताकदीने कामाला लागले पाहिजे, भाजपला पराभूत करायचेच या निश्चयाने सगळ्यांनी कामाला लागावे.
ललिता पाटील या मूळ काँग्रेस पक्षाच्या आहेत, त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदे भूषविली आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पक्षातर्फे त्यांना पक्षाचे महिला आघाडीचे समन्वयक पद देण्यात आले होते. तरीही त्या पक्षात फारशा सक्रिय दिसून आल्या नाहीत. त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. काँग्रेसमध्ये जाणार असल्याबाबतही चर्चा होती.















Discussion about this post