जळगाव । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईने मोठी खळबळ उडाली.
तक्रारदार हे जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक 2021 मध्ये निवडुन आले होते. त्यानंतर तक्रारदार यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे एकाने तिन अपत्य बाबत तक्रारी अर्ज केला होता. दरम्यान ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले महेश रमेशराव वानखेडे वय-३० आणि समाधान लोटन पवार वय-३५ या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबतचा चांगला अहवाल तयार करून देतो, त्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही, यासाठी ३० हजार रुपयांची लाचीची मागणी केली. दरम्यान तक्रार यांनी शनिवारी ९ मार्च रोजी लाचलुचपत विभागात तक्रार दिली.
दरम्यान पथकाने सापळा रचून संशयित समाधान लोटन पवार हे ३० हजार पैकी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.















Discussion about this post