भोपाळ । भोपाळच्या मंत्रालयातील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून सदर आग इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर लागली आहे. दरम्यान,या आगीत महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झालीत.
आगीची घटना घडताच इमारतीमधील व्यक्तींमध्ये एकच खळबळ उडाली. सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीमधून बाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आगिवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑफिसमध्ये असलेली कागदपत्रे, पुठ्ठे आणि लाकडी सामानाने या आगीत मोठा पेट घेतला आहे. त्यामुळे आगीने आणखी रौद्ररुप धारण केल्याचे दिसतेय.
#WATCH | Madhya Pradesh | A massive fire breaks out at Vallabh Bhavan State Secretariat in Bhopal. Firefighting operations are underway. Details awaited. pic.twitter.com/QBto0QSVIy
— ANI (@ANI) March 9, 2024
बाहेरून पाहिल्यास इमारतीमधून आगीचे लोट आकाशात हवेत दूरवर फेकले जात असल्याचं दिसत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणालाच काही दुखापत झालेली नाहीये. मंत्रालयाच्या इमारतीला एवढी भीषण आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
मंत्रालयाला आग लागली तेव्हा पाच आणि सहा क्रमांकाच्या गेटसमोर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इमारतीत धूर निघताना दिसला. आग लागल्याचं त्यांच्या आधी लक्षात आलं त्यानंतर सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली.















Discussion about this post