मुंबई : महागाईने होरपळून निघणाऱ्या जनतेला दिलासा मिळताना दिसत असून सरकारने जागतिक महिला दिनी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केलीय. घरगुती सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात केली असून यामुळे आता घरगुती गॅस सिलेंडरचा दर 802.50 रुपयांवर आला आहे.
जून 2023 मध्ये गॅस सिलेंडर 1100 रुपयांवर पोहचल्या होत्या. सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केली नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी 300 रुपयांची कपात करण्यात आली होती. सात महिन्यांपासून 14.2 किलोच्या सिलेंडरचा भाव 902.50 रुपये होता. आता सिलिंडर दरात कपात करण्यात आली असून या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हा बदल निवडणुकीपूरताच आहे की नंतर पण ही कपात कायम राहिल, हे लवकरच समोर येईल.















Discussion about this post