जळगाव | जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने हजेरी लावली होती.रिंकूची एक झलक पाहण्यासाठी जळगावकर उत्सुक झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. मात्र या कार्यक्रमानंतर रिंकू चांगलीच भडकली होती.
कार्यक्रम संपल्यानंतर रिंकू जेव्हा बाहेर जात होती, तेव्हा काही चाहत्यांनी धक्काबुक्की केली. गर्दीतून बाहेर पडताना रिंकूलाही एका चाहत्याचा धक्का लागला. त्यामुळे रिंकू चांगलीच भडकली होती. ‘या जागी तुमची मुलगी असती तर चाललं असतं का’, असा प्रश्न रिंकूने त्या चाहत्याला केला. रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
जळगाव येथे शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सव आयोजित केला होता. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास अभिनेत्री रिंकू राजगुरु हिची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात रिंकूने ‘सैराट’मधील तिचा लोकप्रिय डायलॉगसुद्धा म्हणून दाखवला होता. विशेष म्हणजे हा डायलॉग तिने खान्देशी भाषेत म्हणून दाखवला. यावेळी चाहत्यांनी एकच कल्ला केला. कार्यक्रम संपल्यानंतर तिथून बाहेर पडताना काही चाहत्यांनी गर्दीत धक्काबुक्की केली. त्यामुळे रिंकूचा राग अनावर झाला.















Discussion about this post