भुसावळ । भुसावळ शहरातील महेश नगर या उच्चभ्रू वस्तीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी कुंटणखान्यातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नगर येथील ५ मुलींची सुटका करण्यात आली. याबाबत कुंटणखाना चालक दाम्पत्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती
याबाबत महेश नगरातील एका बंगल्यात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांना मिळाली. त्यांनी खातरजमा केल्यावर विशाल शांताराम बहाटे व पल्लवी विशाल बनसाटे या दाम्पत्याचे नाव समोर आले. यानंतर डीवायएसपींनी स्वतः अनोळखी क्रमांकावरून बऱ्हाटेला संपर्क साधला. त्याने तुम्ही रहिवासापासून ते कुठे काम करतात? ही माहिती घेतली, पिंगळे यांनी त्यास दीपनगरात कामाला असल्याचे सांगितले.
यानंतर बन्हाटेने काही वेळाने पिंगळे यांना मुलींचे छायाचित्र पाठकले, त्यातून बन्हाटे कुंटणखाना चालवत असल्याची खात्री होताच रविवारी सायंकाळी ५ वाजता छापा टाकून कुंटणखान्यातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नगर येथील ५ मुलींची सुटका केली. माइंड अँड बॉडी स्कीनकेअर स्पा या नावाने हा गोरखधंदा सुरू होता.याबाबत कुंटणखाना चालक दाम्पत्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती















Discussion about this post