एका चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीने थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. हे पत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. राज्यातील शिक्षक पालकांमधून तिच्या या धाडसावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर या पत्राचे अनेक ठिकाणी स्वागत होत आहे.
नेमकं काय म्हटलं आहे पत्रात :
तिमसा सय्यद असे या मुलीचे नाव असून चंद्रपूर जिल्ह्यातील जि. प. प्रा. शाळा गोंडगुडा इयत्ता ४ थी च्या वर्गात ती शिक्षण घेत आहे. तिने पत्रात म्हटलंय की, माननीय मुख्यमंत्री तुम्ही दिलेलं पाठ्यपुस्तक मला आवडलं नाही. कारण आता एका विषयासाठी चार-चार पुस्तकं शोधावे लागतात. यापेक्षा आमचं जुनं पुस्तक छान होतं. कारण सगळं गणित एका पुस्तकात, सगळं इंग्रजी एका पुस्तकात, सगळं विज्ञान एका पुस्तकात होतं. त्यामुळे एकाच विषयाचं पुस्तक वाचायला मजा यायची. आणि सगळं अभ्यास सोडून तुम्हाला पत्र लिहीत राहायचं का, तुम्ही जिंदा आहेत का, असा मार्मिक सवाल या मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रम
‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया देऊन पत्र लिहून घेणं, त्यासोबतच सेल्फी करून ती पाठवणे, तसंच स्वच्छता मॉनिटर असे उपक्रम राबवले जात आहेत.त्याच पार्श्वभूमीवर विविध सर्व विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्र्याच्या पत्रासंदर्भात हे पत्र आवडलं का, या विषयावर या शाळेतील विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून घेण्यात येत आहेत. यावरच आता या विद्यार्थिनीने सवाल उपस्थित केला आहे.















Discussion about this post