मुंबई : मनोज जरांगे पाठूलील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अंतरवली सराटीत झालेल्या दगडफेकीचे आज विधानसभेत जोरदार पडसाद उमटले असून या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तर अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे.विधानसभा अध्यक्षांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून विधानसभेत जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उधळून लावू म्हणतात. ही भाषा वापरणारे तुम्ही आहात कोण? हा माझा सवाल आहे. कटकारस्थानाची ही योजना बनली कशी? मराठा समाजाची मोनोपॉली एका व्यक्तीला दिली का? जरांगे कुठं राहतात? तो कारखाना कुणाचा? ते दगड कुठूज आले? हे समोर यावं.
अंतरवली सराटी दगडफेकप्रकरणाची एसआयटी चौकशी करा. यामागे राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.















Discussion about this post