Wednesday, February 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सुरक्षा दलाची मोठी कारवाई! चकमकीत ७ नक्षलवादी ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 19, 2025
in राष्ट्रीय
0
छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, २४ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद
बातमी शेअर करा..!

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगल परिसरात आज बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले. यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. राज्य गुप्तचर विभागाचे एडीजी (लॉ अँड ऑर्डर) महेश चंद्र लड्ढा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ठार झालेल्यांमध्ये आंध्र-ओडिशा सीमा (AOB) झोनचा महत्त्वाचा तांत्रिक तज्ज्ञ मेतुरी जोगाराव ऊर्फ शंकर (श्रीकाकुलम) याचाही समावेश असल्याची प्राथमिक ओळख पटली आहे. शंकर हा AOB एरिया कमिटी मेंबर (ACM) होता आणि नक्षलवाद्यांचे शस्त्रास्त्र तयार करणे, संचार यंत्रणा हाताळणे व तांत्रिक नेटवर्क उभारण्यात तो माहिर मानला जात होता.मागील ४८ तासांत १३ नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत.

५० हून अधिक नक्षलवादी जेरबंद हिडमा गटाच्या मृत्यूनंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राज्यभर छापेमारी केली. एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा आणि एलुरू जिल्ह्यांतून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त नक्षलवादी अटक करण्यात आले आहेत. यात केंद्रीय कमिटी, राज्य कमिटी, एरिया कमिटी सदस्य आणि प्लॅटून लेव्हलचे कमांडर यांचा प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “छत्तीसगडहून नक्षलवादी आंध्र-ओडिशा सीमेवर नवे तळ उभारण्याचा आणि स्थानिक कॅडर पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणा सतत नजर ठेवून होत्या. संयुक्त पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली असून, आपल्या जवानांना कसलाही अपाय झालेला नाही.” असे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत आंध्र-ओडिशा सीमेवर माओवादी हालचाली वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

शंकर हा शस्त्रे तयार करण्यात, संप्रेषण प्रणाली चालवण्यात आणि तांत्रिक नेटवर्क्स चालवण्यात तज्ज्ञ होता. सुरक्षा एजन्सींच्या मते, एओबी झोनमध्ये नक्षलवाद्यांच्या तांत्रिक क्षमता बळकट करण्यासाठी हा कॅडर जबाबदार होता. गेल्या काही महिन्यांपासून आंध्र-ओडिशा प्रदेशात माओवादी कारवाया वाढत असताना ही चकमक घडली आहे. नक्षलवादी जंगलात नवीन तळ स्थापन करत आहेत आणि स्थानिक कॅडरना सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे, संयुक्त दलांनी मंगळवारी शोध मोहीम सुरू केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विदर्भात काँग्रेसला मोठं खिंडार; तब्बल २२१ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Next Post

महाराष्ट्रातील आश्रम शाळांमध्ये मेगाभरती! जाणून घ्या पात्रता आणि अर्जप्रक्रिया

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

महाराष्ट्रातील आश्रम शाळांमध्ये मेगाभरती! जाणून घ्या पात्रता आणि अर्जप्रक्रिया

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?

महाराष्ट्रात वीज आणखी महागणार? काँग्रेस नेत्याचा महायुती सरकारवर गंभीर आरोप

February 11, 2026
डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या – पालकमंत्री यांची मागणी

डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या – पालकमंत्री यांची मागणी

February 11, 2026
‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शना’च्या लोगोचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण

‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शना’च्या लोगोचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण

February 11, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

पाळधीजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर – संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

February 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page