नवी दिल्ली । देशाच्या केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. दौलत बेग ओल्डी येथे युद्ध सुराव सुरु होते. रणगाडे नदी पार करताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यात रणगाड्यामधील जवान अडकले. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाले आहेत.
दौलत बेग ओल्डी भागात रणगाड्यांचा अभ्यास सुरु होता. सैन्याचे अनेक टँक्स इथे आहेत. रणगाडे नदीपार कसे नेले जातात, याचा अभ्यास सुरु होता. एक टँक नदी पार करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक नदीचा प्रवाह गतीमान झाला. त्यात रणगाडा वाहून गेला.
या रणगाड्यात 4 ते 5 जवान होते. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, लडाखमध्ये नदी ओलांडताना झालेल्या दुर्दैवी अपघातात आपल्या पाच शूर भारतीय सैन्याच्या जवानांचा मृत्यू झाल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. या दु:खाच्या वेळी देश त्यांच्या पाठीशी उभा आहे















Discussion about this post