मुंबई । गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. दरम्यान अशातच राज्यात आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडटांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट?
आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली होती. आता मान्सूनचे वेध लागले असून 10 जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.















Discussion about this post