झारखंडमधील बरहेटमध्ये दोन मालगाड्याची जोरदार धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर चार जण जखमी आहेत. जखमीवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.ही धडक इतकी भयानक होती की दोन्ही मालगाड्यांच्या इंजिनाचा चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मालगाड्या कोळसा वाहून नेहत होत्या. त्याच वेळी फरक्का येथून ललमटियाकडे एक मालगाडी निघाली होती. त्यावेळी एकाच ट्रॅकवर आल्यामुळे जोरदार धडक झाली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. अपघातानंतर मालगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अपघातामुळे रेल्वे मार्ग बंद झाला आहे.
रेल्वे अपघाताची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहचले. बचावकार्य तात्काळ सुरू झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातामध्ये दोन्ही लोको पायटलचा दुर्देवी मृत्यू झालाय. मृतदेह रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात ४ जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेल्वेकडून प्रत्येक गोष्टीची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
Discussion about this post