छत्रपती संभाजीनगर । पंढरपूरला जाऊन विठ्ठल रखुमाईंचं दर्शन घेऊन आल्यानंतर एका तरूणाने नको ते पाऊल उचललं आहे. तरूण आधी आषाढी एकादशीनिमित्त वारीला जाऊन आल्यांनतर त्यानं स्वत:ला संपवलं. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज रांजणगाव इथे घडली असून धनंजय आत्माराम पडघम (वय वर्ष ३४) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, तरूणाने आत्महत्या का केली? याचा शोध घेत आहेत.
धनंजय आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी तो गेला होता. वारी दरम्यान, त्यानं व्हिडिओ शूट करून शेअर केला. या व्हिडिओमध्ये पंढरपूर आणि वारीचा अनुभव शेअर करताना दिसत आहेत.
दर्शन घेतल्यानंतर धनंजय पुन्हा छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज रांजणगावात परतला. त्याने रात्री घरातच गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तपासणी केली असता पोलिसांना धनंजयच्या खिशात आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडले.
धनंजय छत्रपती संभाजीनगरमधील घरात एकटाच राहत होता. पोलिसांनी घटनेची नोंद करत मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला आहे. धनंजयने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? पंढरपुरात जाण्यापूर्वी त्याचं कुणासोबत भांडण झालं होतं का? त्याला कोणत्या गोष्टीचा मानसिक त्रास होता का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Discussion about this post