भुसावळ । जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भुसावळ शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाच्या खून झाल्याची घटना समोर आली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात महादेव मंदिरा जवळ पूर्व वैमनस्यातून रविवारी नाजीर शेख नशीर (वय ३१) या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीत चाकूने वार झाल्याचे दिसत असून हातावर वार आहेत. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला तपासणी अंती मृत घोषीत केले. मयत नाजीर शेख नाशिर याच्या आप्तांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात आक्रोश केला.
दरम्यान, पोलिसांनी सदर खुनाबाबत माहिती घेणे सुरू असून फिर्याद दाखल झाल्यावर सविस्तर सांगता येईल असे त्यांनी सांगितले. याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात घटना नोंदविण्याचे काम सुरू होते.
Discussion about this post