पाचोरा (प्रतिनिधी) : गुरुवार ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून मात्र याच दरम्यान पाचोरा शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. नवरात्रोत्सवात दांडिया खेळताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे तो “दांडिया किंग” म्हणून मानकरी ठरत होता.लखन प्रेमलाल वाधवानी (वय २६, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव असू या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे
लखन हा एकुलता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता. चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपवर कामाला होता. गुरुवारी रात्री शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदीराजवळ नवरात्रोत्सवानिमित्त दांडीया खेळण्याचा कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रमात लखन वाधवानी हा दांडिया खेळत असतांनाच त्याची अचानक प्रकृती खराब झाली. नागरिकांनी त्याला तात्काळ विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले.
यावेळी डॉ. भुषण मगर यांच्यासह वैद्यकीय टिमने तपासणी करून त्याला मयत घोषित केले. कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील रुग्णालयात जाऊन तात्काळ भेट देऊन वाधवानी परिवाराचे सांत्वन केले. लखन वाधवानी हा दांडीयाप्रेमी म्हणून प्रसिद्ध होता. दरवर्षी “दांडीया किंग”चा मानकरी ठरत होता. त्याच्या परीवाराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.















Discussion about this post